मुंबई - गिरगाव चौपाटीवर सुरू असलेल्या 'मेक इन इंडिया' सप्ताहाअंतर्गत रविवारी 'महाराष्ट्र रजनी' कार्यक्रमात मंचाला भीषण आग लागली. लावणी नृत्यादरम्यान मंचाखालून निघालेल्या ज्वालांनी पाहता पाहता रौद्ररूप धारण केले. या आगीत संपूर्ण मंच जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सज्ज असलेली
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व आधीच केलेल्या फायर ऑडिटमुळे ही आग अवघ्या चाळीस मिनिटांत आटोक्यात आणणे शक्य झाले.
कार्यक्रमास उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन, आमिर खान, हेमामालिनी, देश-विदेशातील शेकडो प्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह अनेक दिग्गजांना व हजारो लोकांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. हा हलकल्लोळ सुरू असताना खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन आढावा घेतला. मेक इन इंडियातील इतर नियोजित कार्यक्रम वेळापत्रकानुसार पार पडतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून या घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणाविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही, अशी माहिती उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
पुढे वाचा... लावणीच्या वेळी मंच पेटला... वाचा प्रमुख दोन कारणे....
> सागरी वाऱ्याने भडकली आग....
> आगीमध्ये जीवितहानी नाही, चौकशीसाठी समिती : मुख्यमंत्री
काय म्हणाले फिल्मस्टार....