आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire At The Top Floor Of Lotus Business Park In Andheri West

\'लोटस बिझनेस पार्क\' आग आटोक्यात, फायर ब्रिगेडचा एक जवान शहीद, 15 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंधेरी वेस्ट भागातील 21 मजली 'लोटस बिझनेस पार्क' बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला लागलेली आग अखेर आटोक्यात आली. मात्र, या भीषण आगीने अग्निशामक दलाच्या एका जवानाचा बळी घेतला आहे. नितीन येवलेकर असे याच्या शहीद जवानाचे नाव आहे. या जवानाचा धुराने गुदमरुन मृत्यु झाला. तसेच 15 पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोटस बिझनेस पार्कच्या टॉप फ्लोअरवर आज (शुक्रवार) सकाळी पावणे दहाला भीषण आग लागली. पाहाता पाहाता आगीने रौद्ररुप धारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी आता पोलिसांनी हेलिकॉप्टरची मदत मागितली आहे. नंतर आग विझवण्यासाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.

आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. अग्निशामक दलाचे 32 जवान बिल्डिंगमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली होती. इतकी भीषण आहे की, आग आणि धुराचे लोळ दुरुन स्पष्ट दिसत होते. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 12 पेक्षा जास्त गाड्यांची मदत घेण्यात आली तरीदेखील आग आटोक्यात आली नाही. अखेर कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण बिल्डिंग रिकामी केली. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या खाली हजारोंच्या संख्येने लोक उभे असल्याने बचाव कार्यात खूप अडचणी आल्याचे अग्निशामक विभागाच्या जवानांनी सांगितले. 'लोटस बिझनेस पार्क' पूर्णपणे काचाचे आहे. आग लागताच पार्कचे काच फूटून खाली कोसळले. बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरील रेस्तरॉमध्ये लागली आहे. आग विझवण्यासाठी बचाव पथकाला खूप कसरत करावी लागली. या बिल्डिंगमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे तसेच ‍बॉलिवूड सेलिब्रिटींची ऑफिसेस आहेत. त्यात जवळपास दोन हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, लोटस पार्कमध्ये सिने अभिनेत्यांचेही ऑफिसेस...