आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire Breaks Out At A Garment Factory In Bhiwandi. Five Fire Tenders At The Spot

भिवंडीत गारमेंट गोडाऊनला भीषण आग, इमारतीतील रहिवाशांची सुखरूप सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यातील भिवंडी भागातील कासिमपूर परिसरात एका चार मजली इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कपड्याच्या गोडाऊमध्ये ही आग लागली. कपड्यामुळे आग भडकली व त्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. घटनास्थळी 9 फायर गाड्या आणि 6 पाण्याचे टॅंकर दाखल झाले. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास ही भीषण आग आटोक्यात आली.
अपडेट्स-
चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर कपड्याचे गोडाऊन आहे. याच कपड्याचे गोडाऊनमध्ये आग लागली.
- खाली दुकाने तर वर रहिवासी राहतात. आग खाली लागल्याने वरील मजल्यावरील 62 फ्लॅटमध्ये शंभरहून अधिक लोक अडकले होते.
- आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
- पोलिसांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीने इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात आले.
- ही इमारत गर्दीतील भागात असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते.
पुढे या घटनेची छायाचित्रे पाहा व शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ पाहा...