Home | Maharashtra | Mumbai | Fire breaks out in a building in Dombivili Midc, altra pure fame company destory

डोंबिवली MIDCतील अल्ट्रा प्युअर फेम कंपनी भीषण आगीत जळून खाक

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 05, 2016, 01:05 PM IST

ठाण्यातील डोंबिवली एमआयडीसीमधील एक कंपनी आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाली.

 • Fire breaks out in a building in Dombivili Midc, altra pure fame company destory
  मुंबई- ठाण्यातील डोंबिवली एमआयडीसीमधील एक कंपनी आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाली. अल्ट्रा प्युअर फेम असे या कंपनीचे नाव आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही.
  मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10.30 च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसीत असलेल्या अल्ट्रा प्युअर फेम कंपनीला किरकोळ आग लागली. मात्र, नंतर ही आग भडकत गेली. तसेच शेजारीच सिलेंडर गॅसचे गोदाम असल्याने ही आग तेथे पोहताच सिलेंडर टाक्यांचे स्फोट झाले व आगीचे भीषण आगीत रूपांतर झाले. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या 4 गाड्या मागवल्या होत्या मात्र, आगीचे रूद्र रूप पाहून आणखी 8 गाड्या मागवल्या. अखेर 12 गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न झाला. दोन तासानी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. यामुळे कंपनीचे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
  पुढे पाहा, या भीषण आगीतील छायाचित्रे...

Trending