आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : काळबादेवी परिसरातील आग आटोक्यात, अग्निशमन दलाचे दोन अधिकारी शहीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काळबादेवी परिसरातील निवासी इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात दोन अग्निशमन अधिकाऱ्यांना वीरमरण आले आहे. संजय राणे आणि महेंद्र देसाई अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर सुनील नेसरीकर आणि सुधीर अमीन हे यात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अग्निशमन दलाच्या कार्यालयाबाहेर या दोन्ही अधिकाऱ्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर या दोघांना अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. संजय राणे हे सहाय्यक विभागीय अधिकारी तर महेंद्र देसाई भायखळा येथील अग्निशमन विभागाचे प्रमुख होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच हे अधिकारी त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. आग िवझवण्याचा प्रयत्न करत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने अचानक इमारतीच काही भाग कोसळला आणि त्याखाली हे दोन्ही अधिकारी गाडले गेले होते. त्यानंतर त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान या आगीत जखमी जालेले सुनील नेसरीकर हेदेखिल मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत. आग विझवण्याच्या प्रयत्नात ते 40 टक्के भाजले गेले आहेत. तर त्यांच्याबरोबरच भाजले गेलेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन हे 80 टक्के भाजले गेले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर असून ते सध्या मृत्यूशी लढा देत असल्याची माहिती मिळाली आहे. ऐरोली येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्याशिवायही आणखी दोन जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO...