आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुनमुन सेन यांच्या फ्लॅटला आग, सामानाची राख मात्र मायलेकी सुरक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार मुनमुन सेन यांच्या मुंबईतील फ्लॅटला शनिवारी मध्यरात्री आग लागली. ही घटना घडली तेव्हा मुनमुन व त्यांची कन्या रिया सेन फ्लॅटमध्ये होत्या. मात्र, आगीची जाणीव होताच काही क्षणातच त्या फ्लॅटबाहेर पडल्या. त्यामुळे त्यांना इजा झाली नाही; मात्र घरातील साहित्याची अक्षरश: राखरांगोळी झाली.
फोटो - आगीमुळे फ्लॅटमधील साहित्याची अशी राख झाली.
जुहूमधील राजू पार्क या सातमजली इमारतीत सेन यांच्या सहाव्या मजल्यावर दोन सदनिका आहेत. येथे मुनमुन व त्यांच्या दोन कन्या रिया व रायमा सेन राहतात. शनिवारी रात्री दोन वाजता अचानक दोन्ही फ्लॅटला आग लागली. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. एसीमधून शॉटसर्किट झाल्याने आग लागल्याचा संशय आहे.