आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीमुळे भिवंडीच्या गोदामाची इमारत कोसळण्याची भीती; आतापर्यंत 16 गोदामे जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भिवंडी येथील माणकोली परिसरात लागलेल्या आगीत 16 गोदामे भस्मसात झाली आहेत. पाणी नसल्याने ही आग विझविण्यासाठी 2 दिवस लागणार  असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

या आगीची माहिती मिळताच ठाणे, कल्याण-डोंबवली आणि भिवंडी अशा महापालिकेतील अग्निशमन दलाने धाव घेतली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. भिवंडी नारपोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सागर कॉम्प्लेक्समधील चेकपॉईंट या कंपनीसह डझनभर गोदामांना आग लागली. आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या परिसरातील सर्व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जवळपास डझनभर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीचे भीषण रुप पाहता, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...