आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिम: झोपडपट्‍टीला लागलेल्या आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माहिममधील नया नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास रहेझा रुग्णालयाजवळ ही आग लागली. या आगीत 150 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. शेकडो नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. अग्निशमनदलाच्या 30 गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आगीत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यताही वर्तवली जात आहे.

झोपडपटटीतील रस्ते अरूंद असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.