आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- माहीम (प.) येथील नया नगर झोपडपट्टीस लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला, त्यात दोन बालकांचा समावेश आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेत 9 व्यक्ती भाजल्या असून त्यांना भाभा आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त केल्यानंतर तब्बल चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
मदत मिळणे अवघड
नया नगर झोपडपट्टी अनधिकृत आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई देता येणार नाही, अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी चंद्रशेर ओक यांनी दिली. तरीही मदतीसाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यहार करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.