आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO & PHOTOS: 50 सिलिंडरच्या स्फोटांनी मुंबईतील कांदिवली हादरली, 2 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे फोटो... - Divya Marathi
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे फोटो...
मुंबई - कांदिवलीच्या दामूनगर भागात सोमवारी दुपारी एका झोपडपट्टीत गॅस गळतीनंतर स्फोट होऊन आग लागली. आगीने आसपासच्या झोपड्यांना विळखा घातला. झोपड्या जळत असताना त्यातील सिलिंडरचा स्फोट होऊन आग पसरली.

आगीत तब्बल दोन हजार झोपड्या पूर्णपणे भस्मसात झाल्या. जवळपास ५० सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समजते. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर ११ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे ११ बंब बोलावण्यात आले होते. आधी एका झोपडीत आग लागली. आग पसरण्यास सुरुवात होताच लोक झोपड्या सोडून बाहेर पळाले. दाट लोकवस्तीमुळे लोकांना सामान घेऊन जाण्यासाछी वेळच मिळाला नाही. त्यामुळेच झोपड्यांत ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला.
पुढे पाहा, समतानगरमधील भीषण आगीची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...