आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीतील प्लास्टिकच्या कारखान्याला अाग; तीन महिलांसह चाैघांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भिवंडीतील प्लास्टिकच्या कारखान्यातील गाेदामाला अाग लागून चाैघांचा मृत्यू झाला तर दाेन जण गंभीररीत्या भाजले. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश अाहे. 
 
दापोडा भागातील हरिहर कंपाउंडमधील या गोदामालाही अाग लागली. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. आग लागली त्यावेळी १६ कामगार कामावर उपस्थित होते. 
 
घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी अाल्या. युद्धपातळीवर प्रयत्न करून त्यांनी अाग अाटाेक्यात अाणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यात चाैघांचा बळी गेला व जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.  शाॅर्टसर्किटमुळे ही अाग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात अाहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...