आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील \'एक्सचेंज\' इमारतीची आग आटोक्यात; नार्कोटिक्स कार्यालय खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर भागातील 'एक्सचेंज' इमारतीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली. तिसर्‍या मजल्यावर असलेल्या नार्कोटिक्स कार्यालयाला ही आग लागली होती. अग्नीशमन दलाच्या 16 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीचे वृत्त समजताच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली.

दरम्यान, आज (बुधवारी) अकारा वाजेच्या सुमारास तिसर्‍या मजल्यावरील नार्कोटिक्स विभागाच्या कार्यालयाला आग लागली होती. या आगीत नार्कोटिक्स विभागाचे कार्यालय जळून खाक झाले आहे.

'एक्सचेंज' या इमारतीत 12 शासकीय कार्यालये आहे. त्यात नार्कोटिक्‍ससह जनगणना, पशुपालन, एचआरडी आदी विभागांचा सभावेश आहे. या इमारतीत एक हजारांहून अधिक लोक काम करतात.

आग लागल्यानंतर इमारती शेजारी असलेल्‍या हिंदुस्‍तान पेट्रोलियमच्‍या डेपोचे काम थांबविण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.