आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशमन अधिकारी सुधीर अमिन यांचे उपचारादरम्यान निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील काळबादेवी परिसरात लागलेल्या आगीत गंभीर भाजलेले अग्निशमन अधिकारी सुधीर अमिन यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमिन यांच्यावर नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अमिन हे 90 टक्के भाजले होते. तसेच त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाली होती. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला होता. मात्र, मागील दोन दिवसापासून अमिन यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. अखेर अमिन यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमिन यांच्यावर आज रात्री 9 वाजता शासकीय इतमामात चेंबूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...