आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळबादेवी आग दुर्घटनेतील तिसरा बळी, सुधीर अमीन यांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काळबादेवी भागातील गाेकुळ इमारतीची अाग विझविताना ८५ टक्के होरपळलेले राष्ट्रपती शाैर्यपदक प्राप्त अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांचा गुरुवारी मृत्यू झाला. ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. या दुर्घटनेतील बळींच्या संख्या आता तीनवर गेली आहे. मृत्यूशी झुंज देत असताना अमीन यांचे रखडलेले प्रमोशन केल्याबद्दल पालिकेवर टीकेची झोड उठली होती.
शनिवारी या चारमजली इमारतीस मोठी आग लागली होती. ती विझविताना दाेन अग्निशमन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर सुनील नेसरीकर सुधीर अमीन हे अधिकारी भाजले होते. अमीन ८५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. गुरुवारी रात्री वाजता भायखळ्याच्या मुख्य अग्निशमन केंद्रामध्ये त्यांना शेवटची सलामी देण्यात आली. अमीन यांच्या मागे पत्नी, मुलगा मुलगी असा परिवार आहे.

४९ वर्षाचे सुधीर अमीन १९८९ च्या बॅचचे अधिकारी होते. रोप रेस्क्युमध्ये त्यांचा हातखंडा होता. मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळी ताज हाॅटेलमधील अनेकांचा त्यांनी जीव वाचवला होता. त्याबद्दल राष्ट्रपतींचे शौर्यपदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.
सहा महिन्यांपूर्वी अंधेरी येथील लोटस पार्क या २३ मजली इमारतीमध्ये अग्निशमन दलाचे ३० जवान अडकले होेते. तेव्हा लष्करी हेलीकाॅप्टरच्या मदतीने आखलेल्या बचाव मोहिमेचे त्यांनी नेतृत्व केले होते. सर्व जवानांची रोप रेस्क्यूने सुटका करण्यात अमीन यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.

३२६ इमारती सपाट; सात जवानांचा मृत्यू
काळबादेवी दुर्घटनेत इमारत कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. मुंबईत गेल्या आठ वर्षांत एकूण ३२६ इमारती कोसळल्या असून त्यामध्ये अग्निशमन दलाचे सात जवान मृत्यू पावले असून १९ जण जवान जखमी झालेले आहेत.

महापौरांनी अडवली होती फाइल
अमीनयांच्याकडे उपमुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचा प्रभारी पदभार होता. मात्र त्यांची नियुक्त त्या पदावर झालेली नव्हती. त्यांच्या पदोन्नतीची फाइल शिवसेनेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी महिने अडवून ठेवली होती. ते जखमी झाल्यानंतर रुग्णालयात उपचार चालू असताना हा प्रकार उघडकीस आला होता पालिका सभागृहाने तातडीने मंगळवारी त्यांचे प्रमोशन केले होते.