आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवनार डंपिंग आग: विषारी वायु व धुरामुळे मुंबईकरांना श्‍वास घेण्यास त्रास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार रात्रीपासून देवनार डंपिंग ग्राऊंडला आग लागली आहे. ती अद्याप आटोक्यात आलेली नाहीये. - Divya Marathi
शनिवार रात्रीपासून देवनार डंपिंग ग्राऊंडला आग लागली आहे. ती अद्याप आटोक्यात आलेली नाहीये.
मुंबई- महिन्याभरानंतर पुन्हा एकदा देवनार डंपिंग ग्राऊंडला आग लागली आहे. गेली 40 तास उलटून गेले तरी आग आटोक्यात येण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान, या आगीमुळे संपूर्ण देवनार आणि चेंबूर परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या आगीमुळे विषारी वायू तयारहोत असून मुंबईकरांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत आहे. देवनारच्या या आगीमुळे महापालिका प्रशासन आधीच होरपळून निघालेले असताना आता मुलुंड डंपिंगलाही आग लागल्याने पालिका प्रशासनाच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.
3 किलोमीटर एरियात लागली आग-
- देवनार डंपिंग यार्डात आता 3 किलोमीटर एरियात आग लागली.
- धुराचे साम्राज्य वाशीच्या पुलापासून ते घाटकोपर लिंक रोडपर्यंत दिसत आहे.
- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस मुंबईत अस्वच्छ हवा राहील.
- चेंबूर, टिळक नगर, पेस्टोम सागर, शिवाजीनगर, मानखुर्द, बैगनवाडी आदी भागात धुरांचे साम्राज्य पसरले आहे.
- केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे की, देवनाग डंपिंग ग्राऊंड आग प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य घालण्यास सांगितले आहे.
महिन्याभरानंतर दुस-यांदा आग-
- देवनार डंपिंग ग्राऊंडला याआधी जानेवारी महिन्यात आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी 7 दिवस अग्निशमन दलाला लागले होते.
- धुराच्या साम्राज्यामुळे व विषारी वायूमुळे पालिकेने चेंबूर ते मानखुर्द भागातील 70-80 शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
- देवनार हे मुंबईतील सर्वात मोठे डंपिंग ग्राऊंड आहे. जे 326 एकरात पसरले आहे.
- अनेकदा हे डंपिंग ग्राऊंड हटविण्याची मागणी होते मात्र अद्याप यावर निर्णय घेतला गेला नाही.
बातम्या आणखी आहेत...