आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसीतील कंपनीला आग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन तासांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
तळोजा एमआयडीत एक कंपनी आहे. दुपारी सर्व कामगार जेवत असताना अचानक एका युनिटला अचानक आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब कंपनीसमोर दाखल झाले.  काही वेळातच जवानांनी आग आटोक्यात आणली. मागील अाठवड्यातच मुंबईतील एका बेकायदा झाेपडपट्टीला भीषण अाग लागून अनेकांचे संसार उद‌्ध्वस्त झाले हाेते.
बातम्या आणखी आहेत...