आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात कात्रज परिसरात 25 वर्षीय महिलेवर गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील दक्षिणेकडील टोक असलेल्या कात्रज परिसरात आज सकाळी एका 25 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. कात्रज- कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगरमध्ये ही घटना घडली असून, संबंधित महिला जखमी झाली आहे. तिच्यावर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोकुळनगरमधील एका गल्लीत राहत असलेल्या राजश्री बेडगे (वय 25) या महिलेवर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात घुसून गोळीबार केला. यात महिला सुदैवाने बचावली. या महिलेवर झाडलेली गोळी तिच्या डाव्या हाताला लागली. या गोळीबार करणारा लागलीच तेथून फरार झाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. ही घटना कोणत्या कारणास्तव घडली याबाबत अद्याप माहिती पुढे आली नाही.
बातम्या आणखी आहेत...