आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुरुड-जंजिरा येथे फिरायला गेलेल्या 6 विद्यार्थिनींवर गोळीबार, दोघी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुरूड जंजिरा येथे फिरायला गेलेल्या 6 शालेय विद्यार्थिनींवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या शाळकरी मुली मुरूडजवळच्या म्हाळुंगे या गावाजवळच्या परिसरात फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी झाडांझुडपातून अज्ञातांनी गोळीबार केला.
गोळीबाराच्या आवाजाने मुली घाबरून पळाल्या. मात्र, त्यातील दोन मुलींच्या दंडाला गोळी लागली. शिवाय घाबरून पळाल्याने त्यांच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. जखमीं मुलींवर अलिबागच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबार करणा-या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
आरोपी आणि गोळीबाराच्या कारणाबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, गोळीबार करणारे शिकारीसाठी आले असण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...