आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभाेलकर हत्या: सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला 6 दिवसाची सीबीआय कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अखेर अडीच-पावणेतीन वर्षांनंतर पहिली अटक करण्यात तपास यंत्रणेला यश मिळाले आहे. सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात कायम साधक म्हणून वास्तव्यास असलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला सीबीआयने शुक्रवारी रात्री उशिरा संशयावरून अटक केली आहे. दरम्यान, वीरेंद्र तावडेला शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात अाले. त्याला 6 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. त्याला 16 जूनला पुन्हा कोर्टात हजर केले जाईल.

वीरेंद्रसिंह तावडे हा सनातन संस्थेच्या संपर्कात गेली पंधरा वर्षे असून गेल्या तीन वर्षांपासून तो संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात वडिलांसह कायमस्वरूपी वास्तव्यास आला होता. गेल्या आठवड्यात बुधवारी सीबीआयच्या दोन पथकांनी पनवेल येथील आश्रमात त्याची दिवसभर कसून चौकशी केली होती. त्या वेळी त्याच्या खोलीचीही सीबीआयने झडती घेतली असता, त्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे आणि एक डायरी सापडल्याची माहिती समोर आली होती. या डायरीत काही मोबाइल क्रमांक आणि ई-मेलच्या नोंदीही चौकशी पथकाला प्राप्त झाल्या होत्या. त्या कागदपत्रांच्या आणि डायरींमधील नोंदींच्या विश्लेषणानंतर ही अटक करण्यात अाली. त्यामुळे दाभोलकर यांच्या हत्येचा उलगडा होण्याची अाशा निर्माण झाली आहे. त्यासोबतच आश्रमात येण्यापूर्वी तावडेचे वास्तव्य पनवेलच्या ज्या कल्पतरू गृहनिर्माण संकुलात होते, तेथील घरावरही सीबीआयने गेल्या आठवड्यात छापा टाकला होता. तेव्हापासून तावडे पथकाच्या रडारवर हाेता.
पुढेे वाचा...
> पुण्यात २० अाॅगस्ट २०१३ राेजी झाली हाेती हत्या
> अटक शुक्रवारी की गुरुवारी?
> तावडे व्यवसायाने डाॅक्टर, १५ वर्षांपासून सनातनच्या संपर्कात
> गुन्हे शाखा अपयशी ठरल्याने सीबीअायकडे दिला तपास
> समीरही ‘साधक’च!
> मुळाशी जाण्याची गरज
बातम्या आणखी आहेत...