आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Death Anniversary Of Balasaheb Held At Shivaji Park

फक्त बाळासाहेबच : आपल्या नेत्याच्या सीडी, डीव्हीडी, पुस्तकांसाठी शिवसैनिकांची झुंबड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतिदिन रविवारी झाला. यावेळी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरातील लाखो लोक मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी शिवाजी पार्कवर गजर होता तो फक्त शिवसेनाप्रमुखांचाच. त्यांच्याविषयीचे प्रेम आणि आदर प्रत्येक क्षणी व्यक्त होता. शिवसेनाप्रमुखांवरील पोवाडे, गाणी, पुस्तके, त्यांच्या छायाचित्रांनी सजलेल्या दिनदर्शिका, स्टिकर, पोस्टर्स, बिल्ले ‘हिंदुहृदयसम्राटांची जीवनगाथा’, ‘बाळासाहेब हृदयातले’ या बाळासाहेबांवरील पोवाड्याच्या सीडी, ‘आठवणीतले बाळासाहेब परत या!’, ‘महाराष्ट्राचा महामेरू’ या शिवसेनाप्रमुखांवरील गीतांच्या सीडी, शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, यांच्या स्टॉल्सवर प्रचंड गर्दी उसळली होती. याच्या खरेदीवर शिवसैनिकांचा भर होता. दादर स्थानकावर लोकल थांबली की त्यातून डोक्यावर भगव्या टोप्या आणि हातात शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र घेऊन असंख्य शिवसैनिक उतरत आणि शिवसेना झिंदाबाद, बाळासाहेबांचा विजय असो, अशा घोषणा देत शिवाजी पार्कवर कूच करत होते.
छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, एका वैभवशाली नेत्यांला वाहिलेली आदरांजली...