Home | Maharashtra | Mumbai | First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja

1934 पासून असे बदलत गेले मुंबईतील 'लालबागच्या राजा'चे रुप; पाहा PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 22, 2017, 11:47 AM IST

गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकता असावी, ह्या मुळउद्देशाने लोकमान्य बाळ गंगा

 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 2017 चा लालबागचा राजा
  मुंबई- गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकता असावी, ह्या मुळउद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.

  25 ऑगस्टला गणेश चतुर्थी. महाराष्‍ट्राचे आराद्य दैवत गणरायाचे या दिवशी आगमन होणार आहे. घरा-घरात तसेच बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळाद्वारा गणपतीची स्थापना केली जाते. गणेशोत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक उत्सवात सहभागी होतात.

  गणेशोत्सवादरम्यान सर्वात जास्त चर्चा असते ती मुंबईतील प्रतिष्ठीत गणपती 'लालबागचा राजा'ची. सर्वाधिक भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेतात आणि नवस करतात. गणेश चतुर्थीनिमित्त आम्ही आपल्यासाठी लालबागच्या राजाचे 1934 पासून ते आतापर्यंतचे दुर्मिळ फोटो घेऊन आलो आहे.

  लालबागच्या राजाची सुरुवात 1934 पासून...
  - लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती आहे.
  - गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांमध्ये समजूत आहे.
  - लालबागच्या राजाची स्थापना इ.स. 1934 साली करण्यात आली.
  - सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.
  - तत्कालीन नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली.
  - 1934 साली होडी वल्हवणार्‍या दर्यासारंगाच्या रुपात 'श्री'ची स्थापना झाली. येथूनच 'नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली आहे.

  गणेशोत्सवातून समाजप्रबोधन....
  इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटले की, स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातुन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, 1934 पासून ते 2017 पर्यंतचे दुर्मिळ PHOTOS...

 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1934 चा लालबागचा राजा (पहिले वर्ष)
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1935 चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1937चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1937चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1938चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1939 चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1940 चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1941चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1942 चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1943 चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1944चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  1945 (डावीकडून) आणि 1946 (उजवीकडून) लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  1947(डावीकडून) आणि 1948(उजवीकडून) लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  1949(डावीकडून) आणि 1950(उजवीकडून) लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  वर्ष 1951 चा लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  1952 (डावीकडून), 1953 (मध्यभागी) आणि 1954 (उजवीकडून) लालबागचा राजा
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  1955 (वरच्या बाजुला डावीकडून पहिला), 1956 (खालच्या बाजूला डावीकडून पहिला) आणि 1957 (वरच्या बाजुला उजवीकडून पहिला) 1958 (खालच्या बाजूला उजवीकडून पहिला)
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  1959(डावीकडून वरचा), 1960 (डावीकडून खालचा) आणि 1961(उजवीकडून वरचा) 1962 (उजवीकडून खालचा)
 • First Glimpse Of Mumbai Famous Lalbaugcha Raja
  1963 (डावीकडून वरचा), 1964 (डावीकडून खालचा) और 1965(उजवीकडून वरचा) 1966(उजवीकडून खालचा)

Trending