आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Leave Power, Then Critise BJP Advise To Shiv Sena

भाजप-शिवसेनेमध्ये दिल्लीवरून बेदिली; राज्यातली सत्ता सोडा - भाजपचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीतभाजपचा दारुण पराभव झाला आणि महाराष्ट्रात आधीपासूनच धुसफूस सुरू असलेल्या भाजप-शिवसेना युतीत मंगळवारी जोरदार शाब्दिक युद्ध भडकले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन हसतमुखाने प्रतिक्रिया दिली. पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच असल्याचे सांगून कोणत्याही लाटेपेक्षा जनतेची सुनामी मोठी ठरते, असा टाेलाही त्यांनी लगावला. उद्धव यांच्या टीकेमुळे तिळपापड झालेल्या भाजपनेही सत्तेतून बाहेर पडा आणि मगच टीका करा, असा सल्लावजा इशारा शिवसेनेला दिला. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले, मोदी लाटेच्या जोरावर सत्ता उपभोगायची आणि वेळ येताच टीकाही करायची असे दुतोंडी वागू नये. दरम्यान, भाजप नेते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्या विधानावर टीका केली आहे.

पुढे वाचा .... तारतम्यबाळगा : दानवे