आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांसाठी खुषखबर! लवकरच धावणार AC लोकल ट्रेन, पाहा PHOTOS...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या एसी कोचची निर्मिती चेन्नई आयसीएफ येथे केली जात आहे. इनसेटमध्ये पाहा कोचचे इंटिरियर. - Divya Marathi
या एसी कोचची निर्मिती चेन्नई आयसीएफ येथे केली जात आहे. इनसेटमध्ये पाहा कोचचे इंटिरियर.
मुंबई- मुंबईत लवकरच देशातील पहिली 12 डब्ब्यांची AC लोकल ट्रेन सुरु होणार आहेत. या नव्या एसी कोचची निर्मिती चेन्नईतील इंटीग्रल कोच फ्रॅक्ट्री (आयएसएफ)त जवळपास अंतिम टप्प्यात आहे. ट्रेन मुंबईत येत असल्याने या कोचची छायाचित्रे एका इंग्रजी वृत्तपत्राने नुकतीच प्रसिद्ध केली आहेत.
काय विशेष आहे या कोचमध्ये?
- रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या एसी कोचमुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणा-या लोकल ट्रेनचे रंग रूप बदलून जाणार आहे.
- स्टीलपासून बनविलेले हे वातानुकूलित कोच स्टील ग्रे आणि इंडिगो रंगात आहेत. याआधी लोकल ट्रेनचे कोच पांढरे आणि पर्पल रंगाचे होते.
- यात राजधानी एक्सप्रेसमधील कोच प्रमाणे मोठी सिंगल विंडो लावलेली असेल.
- कोचचे इंटिरियर मागील वर्षी मुंबईत दिलेल्या नव्या लोकल कोचप्रमाणेच असणार आहे.
- कोचच्या आत लावलेल्या सीटला आतून निळा रंग असेल. या सीट पहिल्यापेक्षा जास्त आरामदायी असल्याचा दावा केला जात आहे.
- या नव्या कोचमध्ये दोन सीटमधील अंतरात वाढ केली आहे. गर्दी झाल्यास या दोन कोचच्यामध्ये प्रवाशांना आरामात उभा राहता येईल अशी सुविधा केली आहे.
- कोचच्या मध्ये उभे राहणा-या प्रवाशांना आधार घेता यासाठी चांगल्या पद्धतीने हॅंडल लावण्यात आले आहेत.
- दरवाजाच्या मध्ये लावण्यात आलेल्या स्टीलच्या खांबाना नवा आकार दिला आहे. जेणे करून अनेक लोक त्याला धरू शकतील.
देशातील पहिली एसी लोकल ट्रेन-
- आधुनिक सेवा-सुविधांनी युक्त देशातील ही पहिली 12 डब्ब्यांची एसी लोकल ट्रेन असेल.
- हिचे सर्व 12 डब्बे एक दुस-याला इंटरकनेक्टेड ( आतून जोडलेले) असतील.
- 2014 पासून चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्ट्रीत या कोचची निर्मिती सुरु झाली आहे.
- आयएसएफने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व 12 डब्ब्यांची ही ट्रेन तयार करण्याची डेडलाईन आखली आहे.
- याच्या निर्मितीसाठी आयसीएफला भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) आणि इतर काही इंजीनियरिंग संस्था, कंपन्या मदत करीत आहेत.
- सुमारे 80 टक्के म्हणजेच 8 कोच बनविण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित 4 कोचचेही जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मार्चमध्ये होणार परीक्षण
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते की, लोकल ट्रेनच्या पहिल्या एसी कोचचे परीक्षण यावर्षी मार्चमध्ये सुरु होईल.
- पश्चिम रेल्वेवर हे परीक्षण 31 मार्चपर्यंत सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- रेल्वे बोर्डने यासाठी ले-आउट आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता मार्च 2014 मध्ये पूर्ण केली आहे.
यूपीए सरकारने केली होती घोषणा-
- मुंबई लोकलच्या ताफ्यात एसी ट्रेन देण्याची सर्वप्रथम 2012-13 सालच्या रेल्वे बजेटमध्ये घोषणा करण्यात आली होती. 2013 किंवा 2014 मध्ये ही ट्रेन धावेल असे सांगितले गेले होते मात्र तांत्रिक कारणाने ते वेळोवेळी पुढे ढकलले जात होते. अखेर 2016 सालात मुंबईमध्ये लोकल एसी ट्रेन धावण्याची आशा आहे.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, आपल्या मुंबईची लोकल एसी ट्रेन नेमकी कशी असेल, पाहा PHOTOS...