आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 69.7 टक्के मतदान, अहमदनगरमध्ये 88 टक्के

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/अहमदनगर- राज्यभरातील 16 जिल्ह्यात आज (शनिवार) ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. अहमदनगर जिल्ह्यात 195 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 82.71 टक्के मतदान झाले आहे. 1 लाख 72 हजार महिला व 1 लाख 95 हजार पुरुष मतदारांनी केले. नगर तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 88 टक्के मतदान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 69.7 टक्के मतदान झाले त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक 87 टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील जवळपास 3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी हे मतदान झाले आहे.. नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक झाली आहे. मराठवाड्यात 1854 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान झाले आहे.
 
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 तारखेला होईल. तर मतमोजणी 16 तारखेला होणार आहे. फडणवीस सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असताना साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सध्या मतदारांच्या मनात नेमके काय चालू आहे, हे समोर येणार आहे. दरम्यान मतदान शांततेत पार पडावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...