आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Sanitary Pad Vending Machine For Lady Police Installed In Thane Police Station

ठाणे: महिला पोलिसांसाठी ठाण्यात सॅनिटरी नॅपकिन वेन्डिंग मशिन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनिटरी नॅपकिन वेन्डिंग मशिन लाँच करताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व रश्मी करंदीवर इतर मान्यवर... - Divya Marathi
सॅनिटरी नॅपकिन वेन्डिंग मशिन लाँच करताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व रश्मी करंदीवर इतर मान्यवर...
ठाणे- मासिक पाळीदरम्यान महिला पोलिसांची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी ठाणे पोलिस मुख्यालयात व वाहतूक नियंत्रण शाखेत सॅनिटरी नॅपकिन वेन्डिंग मशिन नुकतीच बसविण्यात आली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डीसीपी रश्मी करंदीकर यांच्यासह पोलिस दलातील कर्मचारी उपस्थित होते.
काय व कसे चालते सॅनिटरी नॅपकिन मशिन

- एचएलएल या कंपनीचे हे मशिन असून बॅंकेच्या एटीएमप्रमाणे हे मशिन कार्य करते.
- तुम्ही या मशिनमध्ये 10 रूपये टाकताच सॅनिटरी नॅपकिन पॅड बाहेर येईल.
- ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या पुढाकाराने आणि नगरसेविका पूजा वाघ यांच्या अर्थसाहाय्यातून दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेण्डिंग मशीन उपलब्ध
- यातील एक मिशन ठाणे पोलिस मुख्यालयात तर दुसरे मशिन वाहतूक नियंत्रण कक्षात
- या दोन मशिनमुळे ठाणे पोलिस दलात कार्यरत असलेल्या 600 हून अधिक महिला पोलिस कर्मचा-यांना फायदा होणार.
पुढे आणखी पाहा...