आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेककडे पहिल्यांदाच सूत्रसंचालन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दरवर्षी विविध देशांत आणि भव्यदिव्य स्वरूपात पडद्यावरील ता-यांच्या उपस्थितीत होणारा झी सिने अवॉर्डचा सोहळा यंदा मुंबईत पार पडला. हा पुरस्कार सोहळा म्हटला की माइक न सोडणारा शाहरुख खान प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर येतो. मात्र, यंदा प्रथमच झी सिने अवॉर्डच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्युनियर बच्चन अर्थात अभिषेक आणि त्याचा साथीदार रितेश देशमुखकडे होती. रविवारी सायंकाळी रात्री 8 वाजता झी टीव्हीवर या शानदार सोहळ्याचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.

या सोहळ्यात अभिषेकने अशी काही रंगत आणली की प्रेक्षक पोट धरून हसू लागले. झीची खासियत म्हणजे येथे बॉलीवूडमधील आघाडीचे तारे केवळ उपस्थितच राहत नाहीत तर आपल्या परफॉर्मन्सने कार्यक्रमातही खरी रंगत आणतात. यशराज स्टुडिओ आणि झी सिने अवॉर्ड हा योग जुळून आला असताना शाहरुख खानने या कार्यक्रमाला आपल्या अनोख्या स्टाइलने चार चाँद लावले. पांढ-या घोड्यावर एंट्री करत त्याने यश चोप्रा स्टाइलमध्ये अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ आणि करिष्मा कपूर या नायिकांसोबत स्टेजवर रोमान्स केला. दीपिका पदुकोनने शामक दावरच्या नव्या ‘वॉकिंग’ डान्स स्टाइलचे सादरीकरण केले.

अनुष्काची ‘बिजली’
अनुष्का शर्माने ‘मटरू की बिजली का मंडोला’ या चित्रपटातील ‘ओए बॉय’ या गाण्यावर धम्माल नृत्य केले, तर कॅटरिनाने ब-या च कालावधीनंतर रंगमंचावर ‘माशा अल्लाह’ या लोकप्रिय गीतावर नृत्य केले.