आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fish Prices Hit Roof As Fishermen Refuse To Budge

मच्छीमारांचा बंद ‘जैसे थे’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मच्छीमारांना किरकोळ दरात डिझेल विक्री करण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला असला तरीही मच्छीमारांनी बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यानुसार शनिवार आणि रविवारी मच्छीमारांच्या बोटी बंद राहणार आहेत. डिझेल दराबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्याची सूचना वीरप्पा मोईली यांनी केली आहे.

सोमवारी तेल कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर डिझेल दरातील तफावत बघून, संपाबाबतचा निर्णय घेणार असल्याचे मच्छीमार संघटनांकडून सांगण्यात आले आहे. मच्छीमारांच्या आंदोलनामुळे पेट्रोलियम मंत्रालयाने किरकोळ डिझेल विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आधी ६4 रुपये लिटर दराने मिळणार डिझेल यापुढे 53 रुपये दराने मिळणार आहे. यापूर्वी मच्छीमारांना ठोक ग्राहक म्हणून गृहीत धरले जात होते. नव्या निर्णयानुसार मच्छीमारांचा समावेश किरकोळ ग्राहकांत होणार असला तरी त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.