आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Social Media: मुंबई-पुणे हायवेवर माशांचा पाऊस, गोळा करण्यासाठी लोकांची उडाली झुंबड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्यावर पडलेले मासे गोळा करताना लोक पिशव्या घेऊन आले होते. - Divya Marathi
रस्त्यावर पडलेले मासे गोळा करताना लोक पिशव्या घेऊन आले होते.
मुंबई/पुणे - जगात असे अनेक रहस्य आहेत जे मानवाच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडे आहेत. त्यापैकीच एक आहे आभाळातून मासळ्यांचा पाऊस. मुंबई-पुणे हायवेवर सोमवारी दुपारी मासळ्यांचा पाऊस झाला. या पावसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण खरंच मासळ्यांचा पाऊस झाला की एखाद्या ट्रकमधून हे मासे पडले याची नेमकी माहिती मिळू शकली नाही. तसेच हा रस्ता मुंबई-पुणे हायवे असल्याचेही खात्रीशीर समजू शकले नाही.

लोक गाड्या थांबवून गोळा करत होते मासे
> सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मुंबई-पुणे हायवेवर लोक मासे गोळा करताना दिसत आहेत.
> लोकांनी सांगितल्यानुसार, कित्येक किलोमीटर हा मासळ्यांचा पाऊस झाला.
> मासे उचलण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे काही तास रस्ता जाम झाला होता. हायवेने प्रवास करणाऱ्या लोकांनी गाड्या थांबवून मासे गोळा केले.
> काही लोकांनी या घटनाक्रमाचा पूर्ण व्हिडिओ आपापल्या मोबाइलमध्ये तयार केला आणि फेसबुक, ट्विटर यावर अपलोड केला.
> या प्रकारच्या पावसाची अधिकृत घोषणा प्रशासनाकडून मात्र अद्याप करण्यात आलेली नाही.

याआधीही झाला असा पाऊस
जगामध्ये असा पाऊस अनेक वेळा आणि अनेक ठिकाणी झाला आहे.
जून 2015 मध्ये माशांचा पाऊस आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील गोलमुंडी गावात झाला होता.

काय आहे कारण
- शास्त्रज्ञांनी याचा सविस्तर अभ्यास केला आहे. त्यांनी अभ्यासांती सांगितले आहे की अशा प्रकारच्या घटना समुद्री वादळामुळे होतात.
- जेव्हा समुद्री वादळ तळसोडते तेव्हा त्याचे मोठ्या वादळात रुपांतर होते.
- यावेळी वादळ आपल्यासोबत मासे, बेडूक, कासव, खेकडे असे समुद्री जीव घेऊन तसेच कधीकधी मगरींना घेऊन जाते.
- हवेचा वेग मंदावतो आणि तेव्हा हे वादळ जिथे असेल त्याच्या आसपासच्या परिसरात ही जीव पावसासोबत खाली येतात.
- शास्त्रज्ञ बिल इव्हांस यांच्या पुस्तकात म्हटल्यानुसार, जलचर प्राणी वर्षभरातून किमान 40 वेळा पावसाच्या पाण्यासाबोत आकाशातून खाली पडतात.

अशीही शक्यता...
असेही म्हटले जात आहे की येथून माशांनी भरलेला ट्रक जात असताना त्यातून ते पडले असावे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, माशांचा पाऊस आणि लोकांची उडालेली झुंबड
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...