आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fishermen Advised Not To Venture Into The Sea During Next 48 Hour

धोकादायक \'अशोबा\' वादळ ओमानकडे सरकले, गुजरात-महाराष्ट्रावरील धोका टळला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, मुंबई व गुजरातच्या अरबी समुद्रात पुढील 36 तासांत अशोबा नावाचे धोकादायक चक्री वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र हे वादळ आता ओमानकडे सरकले असून महाराष्ट्र-गुजरातवरील धोका त्यामुळे टळला आहे. यामुळे कर्नाटक, गोवा आणि कोकणात पुढील 48 तासांत मुसळधर पाऊस पडण्याची शक्यता होती. सोमवारी हे वादळ दक्षिण पश्चिम मुंबईपासून सुमारे 470 किमी आणि ओमानच्या दक्षिण पूर्वमधील मसीरा टापूपासून 960 किमी दूर होते. मात्र, कोकणातील पाऊस पळाला असून, हे वादळ आता कोकणसह अरबी समुद्रात फारसे त्रासदायक ठरणार नाही.
हवामान खात्याने भीती व्यक्त केली आहे की, उत्तर आणि उत्तर पश्चिमच्या दिशेने हे वादळ पुढील 36 तासांत धोकादायक तुफानी वादळ येऊन धडकू शकते. अशोबा वादळाच्या भीतीने उत्तर आणि उत्तर पश्चिमच्या दिशेने समुद्रात मच्छिमारांनी जाऊ नये असा इशारा दिला आहे.
या वादळामुळे कर्नाटक, गोवा आणि कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तास मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे हवामान खात्याने म्हटले आहे. समुद्रात असणा-या मच्छिमारांना किना-यावर येण्यास सांगितले आहे. या क्षेत्रात उठणारे हे 36 वे मोठे चक्रीवादळ असणार आहे त्यामुळे श्रीलंकेने त्याचे नामकरण 'अशोबा' असे केले आहे.