आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाॅँडरिंग प्रकरण: अाराेग्य तपासणी अहवालावर छगन भुजबळांचा अाक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालाच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करत माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकारी पक्षावर जोरदार आरोप केले. सरकारला आपल्याला तुरुंगातच ठेवायचे असल्यानेच आपण तंदुरुस्त असल्याचा वैद्यकीय अहवाल देण्यात आल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.

महाराष्ट्र सदन घाेटाळा मनी लांॅडरिंगप्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळल्यानंतर तब्येतीचे कारण पुढे करत त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सध्या न्या.पी.एन.देशमुख यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सुटीकालीन सत्रात भुजबळांच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी त्यांची नव्याने वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार भुजबळांची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात अालेला अाहे.

२५ वर्षांपासून अाजार
भुजबळांनागेल्या २५ वर्षांपासून मानसिक तणाव, मधुमेह, मूत्रसंसर्ग असे विविध आजार असून, सध्याचे त्यांचे वय पाहता त्यांना वैद्यकीय देखभालीची अावश्यकता अाहे. तसेच घटनेच्या कलम २१ नुसार आपल्याला आपल्या इच्छेनुसार डॉक्टर आणि रुग्णालय मिळणे हा आपला अधिकार असल्याचेही अॅड. अमित देसाई यांनी भुजबळांच्या वतीने स्पष्ट केले. पुढील सुनावणी गुरूवारी होणार आहे.

तपासणीच्या वैद्यकीय अहवालात आपली जन्मतारीख २४ मे १९४७ अशी नमूद करण्यात अाली असली तरी प्रत्यक्षात १५ ऑक्टोबर १९४७ ही आपली खरी जन्मतारीख अाहे. त्यामुळे हा अहवाल आपलाच आहे की इतर कोणत्या व्यक्तीचा आहे?

वैद्यकीय अहवालाचा एक भाग असलेल्या ईसीजी रिपोर्टमध्ये सर्व गोष्टी काॅम्प्युटराइज्ड असताना फक्त आपले नावच हाताने लिहिणे हेही संशयास्पद अाहे.
ईसीजी, रक्ताच्या चाचण्या आणि एक्स रे यांच्या चाचण्या आणि त्यांचे अहवाल यांच्या दिवस आणि वेळेत विसंगती अाहे.

एक्सरे चा अहवाल २५ मे रोजीचा असताना, तपासणी अहवाल मात्र त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे २४ मे रोजी कसा तयार झाला.
बातम्या आणखी आहेत...