आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Five Accused Arrested In Mumbai Woman Journalist Gang Rape Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई बलात्‍कारः एका आरोपीला अटक, दोन नराधमांची ओळख पटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्‍ली- महालक्ष्मी भागात शक्ती मिल कंपाउंडमध्ये महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी शुक्रवारी एकास अटक करण्यात आली. इतर आरोपींपैकी दोघांची ओळख पटल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे इतर दोन आरोपींना तत्काळ अटक करण्यात पोलिसांना यश येईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवला जाणार असून पीडित मुलीचे कुटुंबीय मागतील तो वकील सरकारतर्फे देण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले. महिला पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्र्यांची भेट घेऊन बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवला.