आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेंग्विन हाऊसमधून पाच जण बाहेर, प्रकाशक चिकी सरकार यांनी दिला राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतातील सर्वात माेठ्या व अत्यंत प्रतिष्ठित पेंग्विन रँडम हाऊस या प्रकाशन संस्थेतून एकाच दिवशी तब्बल पाच जण बाहेर पडले अाहेत. प्रकाशक पदावर असलेल्या चिकी सरकार यांनी राजीनामा जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अाणखी चार जणांनी राजीनामा दिल्याने पेंग्विनला माेठा धक्का बसला अाहे. शिवाय चिकी यांचे वडील अविक सरकार यांनी पेंग्विनमधला अापला वाटा काढून घेतल्यास पेंग्विनसाठी अार्थिक पाेकळीही निर्माण हाेण्याची शक्यता अाहे.

चिकी यांनी राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठ संपादक नंदिनी मेहता, डिझाइन विभागाचे प्रमुख गेव्हिन माॅरिस, व्यवस्थापकीय संपादक अार शिवप्रिया अाणि काॅपी एडिटर्स विभागप्रमुख जयश्री राम माेहन यांनी लगेचच संध्याकाळी अापले राजीनामे पेंग्विनकडे सुपूर्द केले. चिकी या २३ एप्रिलला पेंग्विनमधून अधिकृतरीत्या बाहेर पडणार अाहेत, तर इतर चार जण एक महिन्यानंतर बाहेर पडणार अाहेत. चिकी यांच्यानंतर पेंग्विनमध्ये संपादकीय प्रमुख मेरू गाेखले, मिली एेश्वर्या अाणि उदयन मित्रा काम पाहणार अाहेत, असेही पेंग्विनचे सीईअाे गाैरव श्रीनागेश म्हणाले.

...तर ५० काेटींचा ताेटा
पेंग्विनमधून बाहेर पडल्यानंतर चिकी सरकार नवीन प्रकाशन संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नात अाहेत. स्वत: चिकी यांचे वडील अविक सरकार हे एबीपी ग्रुपचे काे-अाेनर अाहेत. त्यांनी पेंग्विन इंडियामधील अापले ४५ टक्के समभाग काढून घेतले तर पेंग्विनला ५० काेटींचा ताेटा हाेऊ शकताे. मात्र, याबाबत चिकी यांनी अद्याप कुठलीही स्पष्ट घाेेषणा केलेली नाही. अविक सरकार यांनी हा समभाग काढून घेतल्यास त्या जाेरावर चिकी सरकार नवीन प्रकाशन संस्था स्थापन करू शकतात, अशी चर्चा अाहे.

काय अाहे पेंग्विन रँडम हाऊस ?
अमिताव घाेष, एस हुसेन झैदी, शिल्पा रानडे, यू.अार.अनंतमूर्ती यांसारख्या प्रतिष्ठित लेखकांची पुस्तके पेंग्विनने छापली अाहेत. संजय बारू यांचे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे गाजलेले पुस्तक पेंग्विननेच छापले हाेते. रामचंद्र गुहा, रवी सुब्रमण्यम यांची पुस्तकेही पेंग्विनने लाेकप्रिय केली अाहेत. इंग्रजी अाणि हिंदी भाषेत पेंग्विनने अनेक पुस्तके प्रकाशित केले अाहेत. यात व्ही. एस. नायपाॅलसारख्या लेखकाचे हिंदीत पुस्तक आणले. प्रतिष्ठित लेखकांची सर्वाधिक बेस्ट सेलर पुस्तके पेंग्विनच्या नावावर अाहेत. दरम्यान, पाच जण बाहेर पडत असल्याने संस्थेसमोर संकट उभे राहिले आहे.

गेल्या वर्षी पुस्तकांच्या मार्केटमध्ये उत्तम व्यवसाय केला असला तरी अाता या पाच जणांच्या एक्झिटमुळे नवे अाव्हान पेंग्विनसमाेर उभे ठाकले अाहे.

बाहेर पडण्याचे कारण काय?
भारतात इतरही काही प्रकाशन संस्थांची लाेकप्रियता वाढत असल्याने पेंग्विननेही अापल्या मार्केटिंगच्या धाेरणाबाबत अाक्रमकपणे काही बदल करायला सुरुवात केली हाेती. हे बदल संपादकीय टीमला मान्य नव्हते. याशिवाय अलीकडेच पेंग्विन अाणि रँडम या दाेन स्वतंत्र संस्था एकमेकांमध्ये विलीन करून पेंग्विन रँडम हाऊस ही संस्था स्थापन करण्याबाबतही संपादकीय मंडळी नाराज असल्याची चर्चा अाहे. इतक्या माेठ्या प्रकाशन संस्थेतील पाच प्रतिष्ठित व तज्ज्ञ मंडळी बाहेर पडल्याने पेंग्विनला अाता अॅलेफ, रूपा यांसारख्या माेठ्या प्रकाशन संस्थांच्या तगड्या स्पर्धेला सामाेरे जावे लागणार अाहे.