आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोका: मुंबई विमानतळावर मानव रहित पॅराशूट्स, PMO ने मागवला अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई विमानतळावर संशयितरित्या उडवलेल्या मानव रहित 5 पॅराशूटवीरांची चौकशी तपास यंत्रणानी सुरु केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) शनिवारी घडलेल्या या घटनेचा अहवाल मागवत ही विमानतळाच्या सुरक्षेत मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. इंडियन एयरफोर्स, नेवी, इंटेलिजेन्स ब्यूरो, सीईएसएफ आणि मुंबई पोलिसांकडून स्वतंत्र खुलासे मागितले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व तपास यंत्रणांचे प्रमुख या रिमोट कंट्रोल्ड पॅराशूट्सची माहितीसाठी आज बैठक घेणार आहेत.
पहिल्यांदा जेटच्या पायलटने पाहिले- जेट एयरवेजचे पायलट कॅप्टन दिनेश कुमार यांनी शनिवारी सायंकाळी 5.55 वाजता सर्वप्रथम ही पॅराशूट्स मुंबई एयरपोर्टवर उडताना पाहिले. त्यांनी याची माहिती तत्काळ एयर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. पायलटने सांगितले की, पॅराशूट टाईट फॉर्मेशनमध्ये हवेच्या दिशेच्या विरोधात वेगाने उड्डाण करीत होते. त्यांनी दावा केला की, सुमारे 6 मिनिटे ही पॅराशूट विमानतळाच्या कक्षेत होती व ती रिमोटद्वारे चालवली जात होती. एयरफोर्सच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ही पॅराशूट मध्यम आकाराची होती तसेच व्यावसायिक जंपर्सच्या पॅराशूटपेक्षा ही छोटी होती.
इंडिगो विमान थांबवावे लागले-
एयरपोर्टवरील हवेतील कक्षेत संशयित पॅराशूट्स उडत असल्याची माहिती एयर ट्रॅफिक कंट्रोलचे अधिकारी जे. पी. दुबे यांना मिळाली. यावेळी कोलकात्याहून येणारे इंडिगो कंपनीचे विमान एयरपोर्टवर लॅंडिंग करणार होते. मात्र, यानंतर अधिका-यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी इंडिगो फ्लाईटला उतरवण्यापासून रोखले. धोका टळल्यानंतर विमानाचे लॅंडिग झाले. एयरपोर्ट अधिका-यांचे म्हणणे आहे की, जर ही पॅराशूट प्लेनच्या इंजिनाला चिकटली असती तर मोठा अपघात झाला असता.
पॅराशूट कोणाची अद्याप माहिती नाही-
एयरपोर्ट अथॉरिटीच्या अधिका-यांनी सांगितले की, जी मानव रहित पॅराशूट्स 150 फूटावर उडताना दिसली त्यांच्याबाबत माहिती घेण्यासाठी जुहू एयरपोर्टसोबतच नेवल एयरबेसशी संपर्क साधण्यात आला. मात्र, पॅराशूट्सबाबत अद्याप कोणतेही माहिती पुढे आली नाही. तपास यंत्रणांनी अद्याप रडार यंत्रणा तपासली नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या भागातील नोंदणीकृत्य पॅराग्लाइडिंग संस्थांची माहिती मागवली आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, आमचे बलून आकाराने छोटी असतात व ती रडारने ट्रेस केली जाऊ शकतात. त्यामुळे ही पॅराशूट्स नेमकी कोणाची होती याबाबत माहिती मिळालेली नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, मुंबई एयरपोर्टचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...