आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Flat Rejected To Marathi Manoos, File Case Against Builder

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी माणसाला फ्लॅट नाकारला, बिल्डरवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रीय व मुस्लिम लोक हे मांसाहारी असल्याने त्यांना आम्ही घरे विकत नाही, असे म्हणून फ्लॅट नाकारणा-या बिल्डर आणि त्याच्या कर्मचा-यावर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.वैभव रहाटे यांच्या तक्रारीवरून बिल्डर राजेश मेहता, कर्मचारी पंकज मेहता यांच्याविरुद्ध भादंविच्या १५३ ब (१)(ब) कलमान्वये गुन्हा दाखल झाला. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणा-या घटकांविरुद्ध या कलमात शिक्षेची तरतूद आहे.

महाराष्ट्रीय व मुस्लिम हे मांसाहारी असल्याने त्यांना आम्ही घरे विकत नाही, असे श्रीनाथजी समूहाच्या कर्मचा-याने ४ मे रोजी सांगितल्याचे रहाटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. म्हणजेच समूहाच्या प्रकल्पात फक्त शुद्ध शाकाहारी समाजांनाच घरे विकली जातात, अशी माहिती त्याने दिली होती.