आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाड पूल दुर्घटना: 63 तासांच्या शोधानंंतर सापडला वाहून गेलेल्या तवेराच्या कॅरिअरचा भाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाड/ मुंबई- मुंबई-गोवामहामार्गावर सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप 35 जण बेपत्ता आहेत. तिसऱ्या दिवशी (शुक्रवार) पावसाचा अडथळा असूनसुद्धा एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डच्या जवानांनी शोधमोहीम राबवली. सायंकाळी अंधार पडल्‍याने शोधकार्य थांबवण्‍यात आले.

तब्बल 63 तासांच्या शोधमोहिमेनंतर वाहून गेलेल्या तवेरा कारचे अवशेष सापडले आहेत. दुर्घघटना घडली त्या ठिकाणापासून अडीच किलोमीटर अंतरावर कारचे अवशेष सापडल्याचे शोधपथकाने म्हटले आहे. दुर्घटनेत बुडालेल्या दोन्ही एसटी बस व इतर वाहने याच भागात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंबेट खाडीजवळ सकाळी तीन मृतदेह सापडले. मृतदेहांंची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर दादली पूल, केंबुर्ली आणि वावे गावजवळ प्रत्येकी एक मृतदेह सापडला.

आज, शुक्रवारी सकाळी दुर्घटना झाली त्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळेे शोधमोहिमेेला विलंंब झाला. पावसाचा जोर ओसरल्याने नौदलाचे पथक सावित्री नदीत उतरले असून शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे.

वाहून गेल्या एकाही वाहनाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यात दोन एसटी बसचा समावेश आहे. दरम्यान, सावित्री नदी दुर्घटना घडली त्या ठिकाणापासून 18 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राला मिळते. नदीच्या पूराचा जोर पाहाता सर्व वाहने व बेपत्ता लोक अरबी समुद्रात सामवल्याची भीतीही वर्तवली जात आहे.

LIVE UPDATES:
- घटनास्थळापासून 6 किमी दूर असलेल्या वडवली गावाजवळ आणखी एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पुरुषाचा आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मृतदेहांची संख्या 22 वर पोहोचली आहे.
- नवेवाडी–आंबेत येथे पुरुषाचा मृतदेह सापडला, अद्याप ओळख पटलेली नाही.
- दुर्घटनास्थळापासून 2.5 किमी अंतरावर तवेराचे अवशेष सापडल्याचे बचाप पथकाने सांगितले.
- नौदलाच्या शोधकार्यात तवेरा गाडीचा कॅरिअरचा भाग सापडला
- केंबुर्लीजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली. अजय गुरव असे त्याचे नाव आहे.
- खिशातील पॅनकार्डवरुन भिकाजी वाघधरे यांची ओळख पटली.
वावे गोरेगावमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली. भिकाजी वाघधरे या व्यक्तीचे नाव असून ते राजापूर-बोरीवली एसटी बसमधून प्रवास करत होते.
- 21 पेेकी 16 मृतदेहांंची ओळख पटली आहे.
- आंबेत खाडीजवळ 3 तर, दादली पूल, केंबुर्ली आणि वावे गावजवळ प्रत्येकी एक मृतदेह सापडला.
- शुक्रवारी सकाळपासून 7 मृदेह सापडले आहेत.
- आणखी तीन मृतदेेह सापडले.
- बेपत्ता प्रवाशी समुद्रात सामवल्याची भीती
- बचाव पथकाच्या जवानांंना सावित्री नदी पात्रात मगरी दिल्याची माहिती
- नदीतील मगरींंचा शोधमोहिमेत अडथळा
- मृतदेहांंची अद्याप ओळख पटलेली नाही
- आंबेट खाडीजवळ आणखी तीन मृतदेह सापडले आहे.
- सलग तिसर्‍या दिवशी शोधमोहिम सुरु
-पावसाचा जोर ओसरल्याने नौदलाचे पथक सावित्री नदीत उतरले
- संततधार पावसामुळेे शोधमोहिमेला विलंंब

महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता बंद
दरम्यान, महाबळेश्वर-पोलादपूर घाटातील रस्ता दरीत कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संततधार पावसामुळे महाबळेश्वर-पोलादपूर घाटाची दुरवस्था झाली आहे. घाटातील रस्ता खचून एक हजार फूट खोल दरीत कोसळला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंंद करण्यात आलेला आहे.
एसटीचालकांंचा मृतदेह सापडला 130 किमी अंंतरावर...
दरम्यान, काल (गुरुवारी) जयगड-मुंबई एसटीचे चालक एस. एस. कांबळे यांचा मृतदेह तब्बल 130 किमी दूर रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्लेच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला. बसचे अवशेष मात्र, अजून सापडले नाहीत. सुमारे 40 तासांपासून ही शोधमोहीम सुरू आहे.

महाडजवळील सावित्री नदीवरचा पूल काेसळण्याच्या घटनेला दाेन दिवस उलटले तरी अद्याप बेपत्ता दाेन एसटी बस व अन्य वाहनांचा शाेध घेण्यात तटरक्षक दल व ‘एनडीअाएफ’च्या जवानांना गुरुवारपर्यंत यश अालेले नाही. बुधवारी या दुर्घटनेतील दाेन जणांचे मृतदेह सापडले हाेते, तर गुरुवारी दिवसभरात अाणखी 12 मृतदेह शाेधण्यात यश अाले. या दुर्घटनेत एकूण 42 जण बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. त्यापैकी चार महिलांसह 14 जणांचेच मृतदेह हाती लागले अाहेत. यापैकी काही जणांची अद्याप अाेळखही पटलेली नाही. दरम्यान, बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांच्या संयमाचा बांध अाता सुटू लागला असून प्रशासन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत अाहे.

मुंबई गोवा महामार्गालगत सावित्री नदी असल्याने हे शोध कार्य पाहण्यासाठी बघ्यांचा महापूर लोटल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर प्रचंड ताण पडून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये किंवा महामंडळात नाेकरी व राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अार्थिक मदत जाहीर करण्यात अाली. मंगळवारी मध्यरात्री सावित्री नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला. पूल वाहून जात असताना पुलावरून जात असलेल्या दोन एसटी बस, एक तवेरासह अनेक वाहने वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चालकाचा मृतदेह 130 किमीवर
गुरूवारी सकाळी आंजर्ले खाडीमध्ये एसटी चालक एस.एस. कांबळेंचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळापासून 130 कि.मी.वर हा मृतदेह आढळला. कांबळे हे जयगड- मुंबई एसटीचे बसचालक होते. अंगावर खाकी वर्दी व बॅच आढळल्याने कांबळेची ओळख पटू शकली. त्यानंतर 80 कि.मी. अंतरावरील हरिहरेश्वर येथे एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर महाडनजिक केम्बुर्ली दासगाव आणि दादली पूल या ठिकाणी प्रत्येकी एक- एक मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आले. हे सर्व मृतदेह त्या त्या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला कळवून त्यांच्या ताब्यात दिले आहेत. सापडलेले सर्व मृतदेह महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून त्यांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे काम सुरु अाहे. राजापूर -मुंबई , जयगड -मुंबई आणि इतर वाहनातून प्रवास करीत असलेल्या बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक यांनी महाड येथे एकच गर्दी केली होती.

या मृतांची पटली ओळख
सापडलेल्या मृतदेहामध्ये संपदा संतोष वाजे (अमृत नगर घाटकोपर मुंबई), दिलीप रामचंद्र वाजे (आवेस), अल्ताफ चौगुले (चिपळूण), पांडुरंग बाबू घाग (दाणेवाली बामनेवाडी चिपळूण), स्नेहल सुनील बैकर (30 सतकोंडी रत्नागिरी), एसटी बस चालक एस. एस. कांबळे (रत्नागिरी), शेवंती मिरगळ यांचा समावेश आहे. इतरांचा अाेळख अद्याप पटलेली नाही.

पालकमंत्री प्रकाश मेहतांवर नाराजी, राजीनाम्याची मागणी
राज्याचे गृहनिर्माण मंत्री व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर स्थानिक नागरिकांची नाराजी अाहे. एवढी माेठी दुर्घटना घडल्यानंतरही मेहता यांना अापदग्रस्तांना मदतीसाठी ठाेस पावले उचलली नसल्याची नागरिकांची तक्रार अाहे. घटना घडून गेल्यानंतर रात्री उशिरा मेहता घटनास्थळी गेल्यावर त्यांना नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागले हाेते. गुरुवारी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हा प्रकार त्यांच्या लक्षात अाणून दिल्यावर मेहता चांगलेच भडकले. ‘तुम्हाला यातले काय कळते, गेली 40 वर्षे अाम्ही सार्वजनिक क्षेत्रात अाहाेत. माझा पक्ष काय ते बघून घेईन,’ अशी भाषा त्यांनी वापरली. त्यांच्या समर्थकांनीही संबंधित पत्रकाराशी अरेरावी केली. दरम्यान, उद्दामपणे वागणाऱ्या अशा मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काॅंग्रेसने केली.
पुढे वाचा...
> बचावकार्य करणाऱ्यांचीच हाेडी उलटली, सुखरूप
> मंत्री गिते यांची घटनास्थळी भेट
> लेकरांनाे सांभाळून या
> महाडच्या दुर्घटनेची न्यायालयीन चाैकशी
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...