आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अप्पर वर्धा भरले 33 गावांना धोक्याचा इशारा, अशी आहे राज्‍यातील पावसाची स्‍थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे राज्‍यात ठिकठिकाणी धरणे पूर्णपणे भरली असून काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात महापूर झाल्‍याने पूरपरिस्‍थिती निर्माण झाली. रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीला चांगलाच पूर आला आहे. राज्‍यातील प्रमुख नद्यांमधील पाण्‍याची पातळी वाढली आहे. जाणून घेऊया राज्‍यातील परिस्‍थिती.
पुणे- पुण्‍यातील खडकवासला धरण 99 टक्के भरले आहे. मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून धरणातून 4280 क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पुणे परिसरात आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सध्या 5 दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. पावसाचा जोर वाढल्यास 10 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे.
गडचिरोली - गडचिरोली जिल्‍ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर परत एकदा पर्लकोटा नदीवरील पूल पाण्यात गेल्याने भामरागडचा संपर्क तुटला आहे. येणाऱ्या 24 तासात गडचिरोलीसह पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्‍यक्‍त केला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, राज्‍यातील पावसाची स्‍थिती..
बातम्या आणखी आहेत...