आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foods Aap, Online Order, News In Marathi, Mumbai

चवीने खाणार त्याला फूड अ‍ॅप्स पुरवणार; ऑनलाइन ऑर्डरमध्ये चौपट वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्मार्टफोनमुळे स्मार्ट झालेल्या महाराष्ट्रीातील ग्राहकांनी गेल्या वर्षभरात अ‍ॅप्सद्वारे दिलेल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डरमध्ये चौपटीने वाढ झाली असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले.
खाद्यपदार्थांची ऑनलाइन ऑर्डर स्वीकारणार्‍या फूडपांडा डॉट इन या कंपनीने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात खाद्यपदार्थांच्या ऑर्डर देण्यासाठी ‘स्मार्टफोन’चा वापर जास्त केला जात असल्याचे दिसून आले आहे. फूडपांडा हे ऑनलाइन फूड ऑर्डरिंगचे देशातील ऑनलाइन व्यासपीठ असून ही कंपनी 30 शहरांमध्ये कार्यरत आहे. पुणे शहरातील विद्यार्थी वर्ग तसेच माहिती तंत्रज्ञान बाजारपेठ आणि मुंबई देशाची व्यावसायिक राजधानी असल्याने या शहरांमधील जीवनाचा वेग प्रचंड आहे. याबरोबर आता अन्य शहरांमध्येही झटपट काहीतरी पोटात टाकण्याला महत्त्व आले आहे. ग्राहक बहुतांशकरून फास्टफूडला जास्त प्राधान्य देत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

महाराष्ट्रीातील जेवणाचे चाहते चव आणि आवडत्या अन्नपदार्थाची निवड करण्यात तज्ज्ञ तर आहेतच; पण त्याचबरोबर आपला प्राधान्यक्रम आणि सेवेचा दर्जा याबाबतही ते सजग आहेत. अशा प्रकारच्या सर्वेक्षणातून ग्राहकांच्या आवडीनिवडी कळतात. परिणामी अन्नपदार्थांची ऑर्डर दिल्यानंतर त्यांना चांगली सेवा देणे शक्य होते, असे ‘फूडपांडा डॉट इन’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सहसंस्थापक रोहित चढ्ढा यांनी सांगितले.

> कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय आवडीचा
> पेमेंटआधी पदार्थाची चव आणि दर्जा तपासता येत असल्याने ग्राहकांची सीओडीला जास्त पसंती.
> कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरचे प्रमाण : 69 टक्के
> ऑनलाइन पेमेंट ऑर्डरचे प्रमाण 31 टक्के आहे.
> महाराष्ट्रीात दुपारी 12 ते 2 आणि रात्री 8 ते 9 या वेळेत खाद्यपदार्थांच्या ऑर्डर जास्त दिल्या जातात.