आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीला पत्नी दाखवून घेतला घटस्फोट; कोर्टाची फसवणूक केल्याचे झाले अनेक वर्षानंतर उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विरारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीपासून विभक्त होण्यासाठी फॅमिली कोर्टात प्रेयसीला पत्नी दाखवून घटस्फोट घेतल्याचे उघड झाले आहे.  पत्नीने देखभाल खर्च आणि संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी पतीला फॅमिली कोर्टात खेचले त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला.
 
विरार येथे राहणाऱ्या एका महिलेचा अमित पंडित याच्याबरोबर विवाह झाला होता. पण पती-पत्नीच्या नात्यात वारंवार खटके उडत असल्याने महिलेने अखेर कोर्टाचे दरवाजे ठोठावले. 
कोर्टाची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर महिलेला अमित पंडित तिचा पती नसल्याची धक्कादायक बातमी समजली. हे कसे शक्य आहे असा प्रश्न तिला पडला. कोर्टाच्या नोंदीनुसार 2007 मध्येच तिने अमितपासून घटस्फोट घेतला होता. अधिक चौकशी केली असता अमित पंडितने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने हा बनावट घटस्फोट घडवून आणल्याचे समोर आले.
 
फसवणूक करणारा आहे खासगी कंपनीत अधिकारी
खासगी कंपनीत अधिकारी असलेल्या 45 वर्षीय अमित पंडित विरोधात BKC पोलिस स्थानकात वांद्रे फॅमिली कोर्टाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अमित पंडितला अटक करण्याआधी पोलिसांनी बनावट कागदपत्रे मागितली आहेत. अमित पंडितचे दुसऱ्या एका महिलेबरोबर प्रेमप्रकरण सुरु होते. ती न्यायालयात अमित पंडितची पत्नी म्हणून हजर झाली व बनावट प्रतिज्ञापत्र सादर केले अशी माहिती BKC पोलिसांनी दिली. कोर्टाने या प्रकरणी नुकतीच पोलिस तक्रार दाखल केली.
 
अवघ्या 6 महिन्यात याचिका मंजूर
पंडितची घटस्फोटाची याचिका अवघ्या 6 महिन्यात मंजूर झाली. घटस्फोटाआधी नाते तुटू नये यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून  समुपदेशनाची काही सत्रे होतात. न्यायालयाच्या निर्देशानुसार अमित आणि त्याची प्रेयसी दोघेही समुपदेशनाच्या सत्राला हजर राहिले व घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्याचे न्यायालयाला सांगितले. अखेर न्यायालयासमोर परस्परसहमतीने त्यांनी घटस्फोट घेतला अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
खोटया घटस्फोटानंतर राहत होता पत्नी, मुलांसोबत
या खोटया घटस्फोटानंतर अमित पंडित पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. त्यांना या घटस्फोटाची काहीच कल्पना नव्हती. 2015 मध्ये अमितच्या पत्नीने घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज केला. त्यावेळी हा प्रकार सर्वप्रथम समोर आला. अमित पंडितने आणि त्याच्या खोटी पत्नी झालेल्या प्रेयसीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...