आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटपाथ मोकळे होणार झोपड्यांचेही पुनर्वसन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील 1.20 कोटी लोकसंख्येपैकी 25 हजार लोकांनी संसार चक्क पदपथावर थाटलेला आहे. पदपथ अडवून बसलेल्या 6 हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन आणि एमएमआरडीएने महात्मा गांधी पथक्रांती योजना हाती घेतली आहे. त्यामुळे वर्षभरात मुंबईतील 120 रस्ते मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत.

झोपडपट्टीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) सध्या मोफत घरे देण्यात येत आहेत. मात्र मुंबईतील 150 रस्त्यांवरील 6 हजार झोपड्यांचा प्रश्न अद्याप सुटला नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महात्मा गांधी पथक्रांती योजना हाती घेतली आहे.

मुंबईतील पदपथावरील झोपडपट्टीधारकांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 20 रस्त्यांवरील 2 हजार 643 झोपड्यांचे पुनर्वसन मार्गी लागले आहे.