आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Antinexal Movement Govt Comes With New Policy

नक्षली चळवळींना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून नवी आत्मसमर्पण योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नक्षलवाद्यांचे संग्रहित छायाचित्र)
मुंबई- राज्यात नक्षली चळवळींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नक्षली चळवळीत ओढल्या गेलेल्यांना सुधारण्याची एक संधी देताना नवीन सुधारित आत्मसमर्पण योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आत्मसमर्पण करू इच्छिणा-या नक्षलवाद्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त भागातील विविध विकासकामे तातडीने होण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदान समिती तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्राम / एरिया रक्षक दलातील नक्षल सदस्याने आत्मसमर्पण केल्यास त्यास आता दीड लाख रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी ही रक्कम 40 हजार इतकी होती. स्थानिक संघटन दलम मधील कमांडर किंवा उपकमांडर किंवा सदस्याने आत्मसमर्पण केल्यास अनुक्रमे तीन लाख, अडीच लाख आणि दोन लाख रुपये दिले जाते. यापूर्वी अनुक्रमे दोन लाख, एक लाख आणि 75 हजार रुपये दिले जायचे. प्लाटून दलम मधील कमांडर, उपकमांडर किंवा सदस्याने समर्पन केल्यास त्यास अनुक्रमे चार लाख, तीन लाख आणि अडीच लाख रुपये देण्यात येतील. कंपनी दलम मधील कमांडर, उपकमांडरने आत्मसमर्पण केल्यास अनुक्रमे पाच लाख आणि साडेतीन लाख रुपये दिले जातील. कंपनी दलमच्या कुठल्याही सदस्याने आत्मसमर्पण केल्यास अडीच लाख रुपये दिले जातील.
कुठल्याही गटाने आत्मसमर्पण केल्यास चार लाख ते दहा लाख रुपये दिले जातील. पूर्वी ही रक्कम अनुक्रमे दोन लाख ते पाच लाख होती. पती-पत्नी असलेले नक्षल सदस्य शरण आल्यास त्यांना दीड लाख रुपये दिले जातील. यापूर्वी त्यांना पन्नास हजार रुपये दिले जायचे. विभागीय समितीच्या सचिव किंवा सदस्याने शरणागती पत्करल्यास अनुक्रमे 10 लाख आणि 6 लाख रुपये दिले जाते. पूर्वी 4 ते 10 लाख रुपये दिले जायचे. त्याचप्रमाणे राज्य समितीच्या किंवा स्पेशल झोन समितीच्या सचिव आणि सदस्यांनी आत्मसमर्पण केल्यास 8 लाख ते 15 लाख रुपये दिले जातील. रिझनल ब्युरो, केंद्रीय कमिटी किंवा पोलिट ब्युरोच्या कुठल्याही सदस्य किंवा सचिवाने आत्मसमर्पण केल्यास त्यांना अनुक्रमे 16 लाख, 18 लाख, 20 लाख रुपये दिले जातील. त्यांना यापूर्वी 4 ते 10 लाख रुपये दिले जायचे.
आणखी पुढे वाचा, सरकारने काय काय उचलली आहेत पावले...