आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Caste Census Agitation Bhujbal, Patil And Janakar Remarks

जातगणनेच्या आकडेवारीसाठी आंदाेलन - भुजबळ, पाटील व जानकरांचा निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जातगणनेची आकडेवारी त्वरित जाहीर करावी तसेच धनगर, कोळी, मराठा, मुस्लिम आणि लिंगायत या समाजांना शासकीय नोक-याआणि शैक्षणिक आरक्षण मिळावे या मागणीसाठी रविवारी (२६) राजर्षी शाहू महाराज आरक्षणदिनी दादरमध्ये महात्मा फुले समता परिषदेचे समीर भुजबळ, ‘रासप’ नेते महादेव जानकर आणि लोकभारतीचे कपिल पाटील यांनी आंदोलन केले.

केंद्र सरकारने जातवार जनगणना केली. परंतु त्याचा तपशील मात्र जाहीर केला नाही. तो लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. मी सत्ताधारी भाजपसोबत असलो तरी ओबीसी प्रश्नावर त्यांच्याबरोबर नाही, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व आमदार महादेव जानकर म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष होऊ न देता मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी आणि िलंगायत समाजाच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी संयुक्त आरक्षण समिती स्थापन करण्यात येत असल्याचे समितीचे निमंत्रक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले. तसेच जातवार जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी यासाठी देशव्यापी आंदोलन उभाण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

जातपडताळणी रद्द करा
शासकीय नोकरीतील आणि अनुदानित माध्यमिक शाळांमधील अनुसूचित जमाती पदांवरील कोळी, धनगर, यल्लम आदी समाजाचे हजारो कर्मचारी आणि शिक्षक जात पडताळणीमुळे संकटात आहेत. जातपडताळणी कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये. तसेच त्यांच्या नोक-याकायम कराव्यात, अशी मागणी या नेत्यांनी केली.