आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Cricket World Cup Matches New Zealand Invited For Cm Devendra Fadanvis

क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना न्यूझिलंडचे निमंत्रण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऑस्ट्रेलिया-न्यूझिलंड खंडात फेब्रुवारी 2015 मध्ये होणा-या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यूझिलंडने निमंत्रण दिले आहे. 100 दिवसावर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेसाठी न्यूझीलंड देशात होणा-या सर्व सामन्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण न्यूझिलंडचे पोलीस व कामगारमंत्री मायकेल वुडहाऊस यांच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांना भेटून निमंत्रण दिले. फडणवीस यांनी ते स्वीकारले.
मायकेल वुडहाऊस यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ भारत दौ-यावर आहे. या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी न्यूझीलंडचे भारतातील उच्चायुक्त ग्रॅहम मॉर्टन आणि राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि न्यूझिलंड यांच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात सामंजस्य करार पूर्वीपासूनच आहेत. महाराष्ट्रात तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांना आजच्या काळाशी सुसंगत कौशल्ये शिकवून त्यांना नव्या अर्थव्यवस्थेत सक्षमपणे तयार करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. कौशल्य विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र व न्यूझीलंड यांच्या दरम्यान सहकार्यास मोठा वाव आहे, असे फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्याचसोबत दुग्धविकासाच्या बाबतीत महाराष्ट्र व न्यूझीलंड यांच्यातील सहकार्याला खूप जुनी पार्श्वभूमी असून या क्षेत्रातही सहकार्य व गुंतवणुकीला वाव असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्याला न्यूझिलंड शिष्टमंडळाने हिरवा कंदिल दर्शिवला.
पुढे पाहा, दोघांच्या भेटीतील छायाचित्रे...