आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Elections Changing University Law Vinod Tawade

निवडणुकांसाठी विद्यापीठ कायद्यात बदल - विनोद तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाविद्यालयांमध्ये पुन्हा विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी १९९२ च्या विद्यापीठ कायद्यात पावसाळी अधिवेशनात बदल केला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी मंत्रालयात दिली. गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयांमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली होती. महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये हिंसाचार वाढल्याने १९९३ पासून या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र २०१३ च्या पावसाळी अधिवेशनात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी महाविद्यालयांमध्ये पुन्हा निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासन दिले होते. भाजप सरकारमध्ये शिक्षणमंत्री झाल्यानंतर विनोद तावडे यांनीही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २०१५ पासून महाविद्यालयात निवडणुका घेतल्या जातील, असे सांगत विद्यापीठ कायद्यात बदल करणार असल्याचे सांगितले होते, परंतु विद्यापीठ कायद्यात बदल झाला नाही.

तावडे यांनी यासंदर्भात विद्यार्थी संघटनांबरोबर बैठक घेतली. यात युवा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, अखिल भारत विद्यार्थी परिषद, एसएफआय, नॉर्थ इस्ट स्टुडंट असोसिएशन आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणुकांचे स्वरुप, पद्धत तसेच निवडून आलेल्या प्रतिनिधींचे अधिकार याबाबत पुढील बैठकीत चर्चा करण्यात येईल, असेही तावडे यांनी या वेळी सांगितले.