आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Lature 450 Crores Rupee Water Scheme From Ujani Dam

लातूरसाठी उजनी धरणातून ४५० काेटी रु. खर्चाची पाणी योजना!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लातूरला पिण्याच्या पाण्याची शाश्वत व कायमस्वरूपी सोय व्हावी म्हणून उजनी धरणामधून ४५० कोटी रुपये खर्चाची पाणी योजना तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. मराठवाड्यातील पाणी आणि दुष्काळप्रश्नी चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती सांगितली.

लातूर, बीड तसेच उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये पाणीच नाही तर द्यायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या साठ वर्षांत उपाययोजना केल्या, पण त्या अगदी तात्पुरत्या स्वरूपात होत्या. कृष्णा खोऱ्यातील २३ टीएमसी पाणी देण्यात आले असले तरी या तीन जिल्ह्यावर ही वेळ अाली नसती. पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याला पाणी न दिल्यामुळेच ही परिस्थिती उद‌्भवली आहे. आता आम्ही रेल्वेने लातूरला पाणी देत आहोत. प्रायोगिक पातळीवर १० वॅगन पाठवल्या आहेत. मंगळवारपासून टँकरने पुरवठा करण्यात येईल, असे खडसेंनी स्पष्ट केले.

उपसा सिंचनचे वीज बिल सरकार भरणार
उपसा सिंचन योजनेचे थकीत वीज बिल शासनामार्फत भरले जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात येत आहे. टंचाई निवारणार्थ ५ कि.मी.अंतरापर्यंत पाणी योजनेची पाइपलाइन टाकण्यासाठीचे व मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे खडसे म्हणाले.