आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • For No Barrier In Nation Service Therefore Rahul Gandhi Decision

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्हणे, देशसेवेसाठी राहुल गांधींनी घेतला आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाची सेवा करण्यात कोणतीही आडकाठी येऊ नये म्हणून काँग़्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे विधान अ.भा. काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्राचे प्रभारी स्वराज जीवन वाल्मीकी यांनी बुधवारी केले. परंतु नंतर काहीतरी भलतेच बोलून गेल्याची जाणीव झालेल्या वाल्मीकी यांनी सारवासारव करत माफीही मागितली. मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात वाल्मीकी पत्रकारांशी बोलत होते. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर त्यांच्या शेजारीच होते. नको ते बोलणार्‍या वाल्मीकींना चांदूरकर यांनी जराही सावरले नाही. वाल्मीकी यांचे वस्त्रहरण ते शांतपणे पाहत होते.

डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान
गरिबी ही मानसिकता आहे. आधी विचार बदलला पाहिजे. या राहुल यांच्या विधानाचा पुनरुच्चार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना हाच मंत्र दिला होता. आंबेडकरांचेच तत्त्वज्ञान राहुल मांडत असल्याचे ते म्हणाले.

चुकीचे बोललो, माफ करा
पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा भलतेच बोललो हे वाल्मीकींना उमगले. माझ्या तोंडून चुकीची माहिती गेली. मी राहुल यांना भेटलो नाही. ही माहिती मी वर्तमानपत्रातच वाचली, असे सांगत वाल्मीकी यांनी माफी मागितली.

याआधी आघाडीबाबत वक्तव्य
सांगली महापालिका काँग्रेसने जिंकल्यानंतर वाल्मीकी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. आणि त्यामध्ये ‘लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादीशिवाय लढवेल, अशी घोषणा त्यांनी केली होती.