आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Railway Projects Government Recomand, Chief Minister Take Meeting MPs

रेल्वे प्रकल्पांसाठी सरकारचा पाठपुरावा, अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्री- खासदारांच्या बैठकीत होणार चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील प्रलंबित आणि प्रस्तावित प्रकल्पांना अधिकाधिक निधी मिळण्यासाठी राज्यातील खासदारांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा, असा आग्रह राज्य सरकार त्यांच्याकडे धरणार आहे. रेल्वेचा अर्थसंकल्प २६ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील खासदारांची बैठक हाेणार आहे. त्यात रेल्वे प्रकल्पांबरोबरच अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत, यासाठी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्रातील रेल्वेमार्गाचे प्रमाण ब-याच राज्यांच्या तुलनेने कमी आहे. राज्यातील आठ रेल्वे प्रकल्पांमध्ये केंद्राने आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी दोन प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे, तर दोन प्रकल्पांना केंद्राची मंजुरी मिळाली. त्याशिवाय चार रेल्वे प्रकल्पांना अजून मंजुरी मिळावयाची आहे. या चार प्रकल्पांना केंद्राने त्वरित मंजुरी द्यावी यासाठी खासदारांनी पाठपुरावा करावा, असे या बैठकीत खासदारांना सांगण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुढे वाचा, रखडलेले रेल्वे प्रकल्प, त्यावर झालेला खर्च