आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Railway Travelling 50 % Discount Who Is Going To Ghuman Suresh Prabhu

घुमान येथील साहित्य संमेलनाला जाणा-यांना रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत- सुरेश प्रभू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- येत्या एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात पंजाबमधील घुमानमध्ये होऊ घातलेल्या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणा-या रसिकप्रेक्षकांसाठी एक खुषखबर आहे. घुमान येथील साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त मराठी रसिकांना जाता यावे व परडावे म्हणून रेल्वेमंत्रालयाने 50 टक्के सवलत देऊ केली आहे. याबाबतची माहिती खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.
पंजाबमधील घुमान येथे 3 ते 5 एप्रिल 2015 दरम्यान यंदा 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनासाठी महाराष्ट्रातून खास दोन रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून या संमेलनासाठी खास दोन रेल्वेंची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी एक नाशिकमधून, तर दुसरी बांद्रा येथून सुटेल. 1 एप्रिल रोजी सुटणा-या या गाड्या 3 तारखेला सकाळी अमृतसर आणि उमरचांदा येथे पोहोचतील. त्यातील नाशिकहून जाणारी रेल्वे ही नागपूरमार्गे पुढे जाणार आहे. तर मुंबईतील बांद्य्राहून जाणारी गाडी पुणे, मनमाड, औरंगाबादमार्गे पंजाबकडे जाईल.
या रेल्वेसाठी प्रत्येकी दीड हजार ते दोन हजार रुपये तिकीट ठेवण्यात आले होते. मात्र, सुमारे दोन हजार किमी अंतरावर हे संमेलन होत असल्याने मराठी प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. दोन रेल्वे गाड्या बुक केल्यानंतर त्यातील एक गाडी मोकळीच जाते की काय अशी स्थिती आहे. मराठी रसिकांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. यावर महामंडळाने रेल्वे मंत्रालयाकडे विनंती केली. सुदैवाने रेल्वेमंत्री मराठी व महाराष्ट्रीयन असल्याने महामंडळाची विनंती त्यांनी तत्काळ मान्य करीत घुमानला जाऊ इच्छित असलेल्या रसिकांसाठी 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकाशकांसाठी रेल्वेत विशेष सोय-

घुमान येथे होणा-या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा अनेक प्रकाशकांनी व्यक्त केली असून प्रकाशकांना पुस्तके नेण्यासाठी रेल्वेमध्ये विशेष सोय करण्यात येणार आहे. यामुळे प्रकाशकांचा पुस्तके नेण्या-आणण्याचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी दिली. घुमानला साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर साहित्य वर्तुळातूनच नव्हे, तर प्रकाशकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पंजाबमध्ये मराठी भाषिकांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे महोत्सवातील ग्रंथप्रदर्शनात पुस्तकांची विक्री होणार नाही. एवढ्या लांब पुस्तके कशी नेणार, असा प्रश्न उपस्थित करून संमेलनालाच न जाण्याचा निर्णय प्रकाशकांनी घेतला होता. मात्र, प्रकाशकांनी आता साहित्य संमेलनावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे.