आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Us Mohan Rawale Subject Is Finished Uddhav Thackeray

आली, शिवसेनेतून मोहन रावलेंबाबत पहिली प्रतिक्रिया आली; \'आमच्यासाठी विषय संपला\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतून सेनेचे पाच वेळा खासदार राहिलेल्या मोहन रावलेंची पक्षातून काल हकालपट्टी केल्यानंतर शिवसेनेची 24 तासानंतर पहिली प्रतिक्रिया अखेर आली. 'रावलेंचा विषय आमच्यासाठी संपला' एवढीच चार शब्दांची प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. याउलट मोहन रावले यांनी केलेल्या गंभीर आरोप व उपस्थित केलेले प्रश्न यावर उद्धव यांनी मौन बाळगणे पसंत केले.
रावले यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन पक्षावर व पक्ष नेतृत्त्वाबाबत तुफान फटकेबाजी केली. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. मात्र, काल दिवसभर व आज दुपारपर्यंत सेनेतून कोणाचीही काहीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे रावलेंच्या आरोपानंतर 24 तासांनंतर प्रसारमाध्यमांसमोर आलेले उध्दव ठाकरे याविषयी काहीतरी भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र रावलेंचा विषय आमच्यासाठी संपला एवढीच माफक व सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. मोहन रावले यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेनेच्या एकाही नेत्याने समोर येऊन खुलासा केलेला नाही किंवा हे आरोप फेटाळून लावलेले नाहीत त्यामुळे शिवसेनेतंर्गत अस्वस्थतता असल्याचे स्पष्ट होत आहे.