आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Yours Connivance Can You Nation Make Small ? MNS

सोयीसाठी देशही लहान करणार का? मा. गाे. वैद्य यांना मनसेचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘राज्ये मोठी आहेत म्हणून लोकांच्या सोयीसाठी ती लहान करा, असे म्हणताना देश मोठा आहे म्हणून लोकांच्या सोयीसाठी तो लहान करा, अशी मागणी कराल का?’, असा प्रश्न मनसेच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गाे. वैद्य यांना करण्यात अाला.

महाराष्ट्र विभाजनाच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे व वैद्य यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला अाहे. गुढीपाडवा मेळाव्यात ठाकरेंनी वैद्य यांच्या वयाचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला वैद्य यांनी शनिवारी उत्तर दिल्यानंतर रविवारी मनसेने पुन्हा एकदा वैद्य यांना प्रतिसवाल केला आहे.
छाेट्या राज्यांची भूमिका वैद्य यांनी मांडली हाेती. मात्र त्यांच्या या भूमिकेला मनसेने विरोध केला आहे. आता ‘वैद्यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ झाली आहे,’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली होती. त्यावर ‘मी वयाची शंभरी पूर्ण करणार अाहे. ज्यांना तसे वाटत नसेल त्यांनी हवे तर माझ्यावर पिस्तुलाने गाेळी चालवावी,’ असे प्रत्युत्तर वैद्य यांनी दिले होते.
त्यामुळे वैद्य यांच्या या उत्तराला मनसेचे नेते आणि प्रवक्ते असलेल्या अनिल शिदोरे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. ‘राज्याची चार राज्ये करण्याचा विषय काढून वैद्य यांनी अगोदरच वातावरणात विष कालवलेले आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या मनातून ते उतरलेलेच आहेत. शिवाय त्यांचे वय हे पिस्तुलाच्या गोळ्यांपेक्षा औषधांच्या गोळ्यांची चिंता करण्याचे आहे, याचे भान त्यांनी ठेवावे,’ असे नमूद केले अाहे.

पुढे वाचा.. सांस्कृतिक धागा ताेडण्याचा प्रयत्न करू नका... काय म्हणाले होते राज ठाकरे....