आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Force One, The Elite Special Commando Force Of Maharashtra

महाराष्‍ट्र फोर्स वन : मिनिटांत दहशतवाद्यांना नेस्‍तनाबुत करू शकतात हे वीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने फ्रान्‍सची राजधानी पॅरिसमध्‍ये हल्‍ले केले. यात 129 नागरिक ठार झाले. त्‍यामुळे मुंबईतसुद्धा हाय अलर्ट लागू करण्‍यात आला. मुंबईमध्‍ये अशाच प्रकारे 26/11 चा हल्‍ला झाला होता. या दोन्‍ही हल्‍ल्‍यात साम्‍य आहे. पण, फ्रान्‍समध्‍ये काहीच तासांत दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले तर मुंबईमध्‍ये याच कामासाठी दोन दिवस लागले होते. दरम्‍यान, पुन्‍हा जर मुंबईत अशा प्रकारचा हल्‍ला झाला तर आता केवळ 15 मिनिटांत दहशतवाद्यांना कंठस्‍नात घातले जाईल. यासाठी महाराष्‍ट्र सरकारने 19 नोव्हेंबर, 2009 रोजी एनएसजीच्या धर्तीवर फोर्स वन स्थापनेचा निर्णय घेतला. त्यासाठी पोलिस दलातले निवडक कंमाडो कठीण प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिजिकल आणि मेंटल ट्रेनिंग घेतलेली 350 तगड्या जवानांची ही फौज देशातल्या अन्य सुरक्षाबलांमध्ये उजवी ठरत आहे. केवळ देशातल्याच नव्हे तर परदेशातल्या कमांडोंनाही प्रशिक्षण देण्याचा मान या फोर्सने मिळवला आहे. आज divyamarathi.com या पॅकेजच्‍या माध्‍यमातून फोर्स वनशी निगडित काही रंजक माहिती सांगणार आहोत.
चार हजार जवानांमधून निवडले 350 जवाना
राज्य पोलिसांतील चार हजार जवानांमधून शारीरिक-मानसिकदृष्या सुदृढ असलेल्या 350 जणांची निवड करून ही फौज तयार झाली. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग, पुणे, डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन येथे या जवानांचे प्रशिक्षण चालते. इस्रायली स्पेशल फोर्स आणि जर्मनीच्या जीएसजी नाइनच्या कमांडोंनी फोर्स-वनला ट्रेनिंग दिले आहे. झारखंड जॅग्वार, आंध्र प्रदेश आणि ईशान्य भारतातील नक्षलविरोधी अभियानातील अधिकाऱ्यांकडून दहशतवादाच्या बदलत्या पद्धती, एकमेकांकडील शस्त्रांच्या प्रोफाइल तसेच ट्रेनिंगचीही देवाणघेवाण केली जाते. 26/11च्या हल्ल्याचा मुकाबला काठ्या आणि 303 रायफलींनी करणाऱ्या मुंबई पोलिसांकडे आता या दलामुळे एके -103, एम- 203, एसडी 6 यांसारखी अद्ययावत शस्त्रसामग्री आणि दारूगोळा आहे.
जागतिक कीर्ती
राज्यातल्या क्विक रिस्पॉन्स पथकांनाच नव्हे तर मोझांबिक देशातील 35 कमांडोंनाही फोर्स-वनच्या अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग दिले आहे. देशातल्या कमांडो पथकांसाठी होणाऱ्या ऑल इंडिया कमांडो चॅम्पियनशिपमध्ये फोर्स-वनने दोन वर्षे पहिल्या पाच पथकांमध्ये स्थान पटकावले आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या फोर्स वन यूनिट बद्दल माहिती...